(हिंदुस्तानी भाषेतील
3503.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
कहे रोवे आगले मरना । गंव्हार तू भुला आपना ॥१॥
केते मालुम नहि पडे । नव्हे बडे गये सो ॥धृपद॥
बाप भाई लेखा नहि । पाछे तू हि चलनार ॥२॥
काले बाल सोपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥
अर्थ :
मेलेल्या मनुष्याकडे पाहून तू का रडतो आहेस अरे गव्हारा पुढे तूही मरणार आहेस हे विसरला आहेस की काय ? अरे आतापर्यंत कितीतरी लहानमोठे प्राणी गेले आहेत त्याचा विचार जर केला तर माहितही नाहीत ते किती आहेत. अरे आतापर्यंत बाप भाऊ हे गेले आहेत आणि त्यांच्या मागे तूही जाणारच आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आतापर्यंत तुझ्यासोबत वाढलेले तुझे काळे केस देखील पाढरे झाले आहेत मग याच गोष्टीची तू खबर घे आणि हरीनाम घेत राहा.
