वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

अनन्यासी ठाव एक सर्व

🙏 3. संत तुकाराम · ABH-079906 · अभंग क्र. ३५२९

3529.
अनन्यासी ठाव एक सर्वकाजे । एकाविण दुजे नेणे चित्त ॥१॥
न पुरता आळी देशधडी व्हावे । हे काय बरवे दिसतसे ॥धृपद॥
लेंकराचा भार माउलीचे शिरी । निढळ ते दुरी धरिलिया ॥२॥
तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढयासाठी ॥३॥

अर्थ :
देवाशी अनन्य असलेले भक्ताचे चित्त एका देवाच्याच ठिकाणी असते एका देवावाचून दुसरे कोणाशीही अनन्य असणे हे भक्ताचे चित्त जाणत नाही. देवाशी अनन्य असलेल्या भक्ताचे हट्ट देवाकडून पूर्ण न होता त्या भक्ताला देशोधडीला जावे लागले तर हे देवाला बरे दिसते काय ? लेकराचा सर्व भार माऊलीच्या माथ्यावर असतो परंतू त्या माऊलीनेच त्या लेकराला जर दूर लोटले तर ते लेकरु कमनशिबीच समजावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही सर्वसमर्थ आहात तरी देखील माझे एवढेसे हट्ट पूर्ण करण्यासाठी एवढयाशा गोष्टीसाठी तुम्ही किती लांबणी घातली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग