वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

सांगा दास नव्हे तुमच

🙏 3. संत तुकाराम · ABH-079811 · अभंग क्र. ३५२८

3528.
सांगा दास नव्हे तुमचा मी कैसा । ऐसे पंढरीशा विचारूनि ॥१॥
कोणासाठी केली प्रपंचाची होळी । या पाया वेगळी मायबापा ॥धृपद॥
नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजू हीर उफराटे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अहिक्य परत्री । नाही कुळगोत्री तुज विण ॥३॥

अर्थ :
हे पंढरीराया मी तुमचा दास कसा नाही याचे तुम्ही विचार करुन उत्तर दयावे. हे मायबापा मी माझ्या संसाराची होळी केली ती कोणासाठी तुमच्या पायापेक्षा वेगळी माझी इच्छा कोणती दुसरी आहे काय ? देवा आम्ही सत्यकर्म करतो तर आम्ही सत्यकर्म करत असताना तुम्ही आम्हाला धीर दयावा. उलट धान्य भाजून ते जसे निर्बीज होते तसे तरी करु नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यावाचून आम्हाला इहलोकात व परलोकात कोणीही कुळ व गोत्र नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग