आदिनाथ शंकरे केला उप
3525.
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केले ॥१॥
तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥
निवृत्तिने गुज सांगितले ज्ञानदेवा । होता जो ठेवा गुह्य कांही ॥३॥
ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनी नीट मार्ग सोपा ॥४॥
