(पंढरीस जाणाऱ्या वार
3541.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
का माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणे ॥१॥
कैसा कंठूनिया राहो संवसार । काय एक धीर देऊ मना ॥धृपद॥
नाही निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसा काही ॥२॥
तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाही समाधान केले माझे ॥३॥
अर्थ :
हे माझ्या मायबापा तुम्ही माझ्यावर विसर का पाडला आहे माझा असा कोणता गुण आहे की ज्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करत नाहीत ? या संसारामध्ये मी कसे कंठून राहू आणि माझ्या मनाला धीर तरी कसा देऊ ? आम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करु नये अशी वार्ता तुमच्याकडून अजूनही आम्हाला पोहोचली नाही त्यामुळेच माझ्या मनाला धीर धरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही एक शब्द देखील खर्च केला नाही व माझे समाधान केले नाही.
