(हिंदुस्तानी भाषेतील
3495.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥धृ॥
इतन गोते काहे खाता । जब तू आपणा भूल न होता ॥१॥
अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥
तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहि लेस ॥३॥
अर्थ :
अरे मानवा तू असे काहीतरी करावे की ज्यामुळे राम तुझ्या घरी येतील आणि सर्व वासनेचा त्याग करुन संसाराचा धंदा बंद करावा. अरे तू जर तुझ्या मूळस्वरुपाला म्हणजे ब्रम्हस्थितीला विसरला नसतास तर तुला या संसारामध्ये एवढे गोते का खावे लागले असते ? मनात एक आणि वरती वागणूक एक असे जरी तू करत असला तरी देखील सर्व जाणणाऱ्या रामाला तुझ्या अंतरंगात काय आहे हे देखील माहित आहे तो सर्व काही जाणत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू सर्वत्र आहे सर्व देश विदेशात भरुन उरलेला आहे एकही जागा त्याच्यावाचून मोकळी नाही.
