वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079883 · अभंग क्र. ३५४०

3540.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
कोणा मुखे ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरी आस मागील बोभाट । वेगी धरिन वाट माहेराची ॥धृपद॥
निलाजिरे चित्त करि तळमळ । केधवा देखती मूळ आले डोळे ॥२॥
तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥३॥

अर्थ :
देवा मी कोणाच्या मुखातून ही गोष्ट ऐकेल की चल तुला पंढरीनाथ बोलवित आहे. बघ मी माझ्या मागे असलेल्या संसाराविषयी कोणतीही इच्छा धरणार नाही त्वरेने माझ्या माहेरची म्हणजे पंढरीची वाट धरीन. माझे चित्त निलाजरे झाले आहे आणि ते तळमळत आहे ते केवळ यासाठी माझ्या माहेराहून मूळ आलेले डोळयाने पाहण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या डोळयाने पंढरी पाहीन असे माझे भाग्याचे उजरी म्हणजे उदय केव्हा होईल ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग