मति माझी लागो सोपनाच
3539.
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥
आणीक न करी दुजा नेम धर्म । सर्व सोपे वर्मं सोपानदेवा ॥२॥
वेदशास्त्रे भांडती ज्यालागीं कोडे । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥
प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥
करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनी राहिला पुढे मागे ॥५॥
