(कवित्वाचा निषेध व त
3514.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
भूतबाधा आम्हा घरी । हे तो आश्चर्य गा हरी ॥१॥
जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥धृपद॥
जागरणाचे फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥
तुका म्हणे देवा । आहाच कळो आली सेवा ॥३॥
अर्थ :
हे हरी आमच्या घरी भूतबाधा व्हावी हे तर आश्चर्यच आहे. आता तर माझ्या भक्तीचा कळशच झाला आहे तुझ्या भक्तीने मला ब्रम्हानंद सुखाचा आनंद प्राप्त व्हावा तर तसे न होता दोषच माझ्या ठिकाणी येऊन वस्ती करु लागले आहेत. हरीभजन केल्याने शांती प्राप्त व्हावी पण असे न होता माझी तळमळच अधिक झाली आहे हेच फळ हरी जागरणाचे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आतापर्यंत तुझी केलेली सेवा ही ढोंगच आहे असे मला कळून आले आहे.
