(कवित्वाचा निषेध व त
3522.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
काशासाठी बैसो करूनिया हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आले एका जिवाच्या उद्धारे । पावशी उच्चारे काय हो ते ॥धृपद॥
नेदी पट परी अन्ने तो न मरी । आपुलिये थोरीसाठी राजा ॥२॥
तुका म्हणे आता अव्हेरिले तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
अर्थ :
देवा तुम्हाला मी केलेले काव्यरचना आवडतच नसेल तर व्यर्थ मी माझ्या काव्यरचनेचा का बाजार करत बसू कशाला व्यर्थ बोभाट व डांगोरा करत बसू. देवा एका जीवाचा उध्दार केल्याने तुझे काय जाणार आहे तुझ्या नावाचा उच्चार जरी आम्ही केला तरी तू आम्हाला मिळशीलच. कोणताही राजा असो आपली सत्ता तो प्रजेला तर देणार नाही परंतू आपला मोठेपणा राखण्यासाठी प्रजेला उपाशीही मरु देणार नाही तो त्यांना खाण्यासाठी अन्न तरी नक्की देईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझा अव्हेरच केला आहे तर मग काव्यरचनेचे दुकान कोण मांडीत बसेल ?
