(हिंदुस्तानी भाषेतील
3501.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
राम कहो जीवना फल सो ही । हरीभजनसु विलंब न पाई ॥१॥
कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥धृपद॥
कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥
कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहि वोसार ॥३॥
अर्थ :
रामाचे नामस्मरण केल्याने जीवनात खरे फल प्राप्त होते त्यामुळे हरीभजन करण्यास विलंब न करता हरीभजन करत राहावे. कोणाचा वाडा आणि कोणाची झोपडी एका रामावाचून सर्व व्यर्थच आहे. कोणाचे शरीर आणि कोणाची माया एका रामावाचून सर्व जाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या जगामध्ये एक रामच सारभूत आहे त्याच्यावाचून सर्व काही नश्वर आहे.
