(हिंदुस्तानी भाषेतील
3506.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
रामभजन सब सार मिठाई । हरी संताप जनमदुख राई ॥धृपद॥
दुधभात घृत साकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥
खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥
कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
अर्थ :
राम भजन सर्व साराचेही सार आहे व ते अत्यंत गोड आहे ते त्रिविधताप आणि जन्मदु:खाचे डोंगराचा नाश करते. दूध, भात, तूप, साखर हे तुमची भूक शांत करतील परंतू अंत:काळी तुम्हाला भवसागरातून तारणार नाही. आपले खाण्यात दिवस निघून जातात आपल्याला गोडधोड खारट आंबट खाण्याची सवय लागते परंतू नंतर प्रारब्धाने ते गोडधोड आंबटही आपल्याला खाण्यास मिळत नाही व नंतर या सवयीमुळेच आपल्याला पश्चात्ताप करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो रामरस पितो त्याला नंतर गोडधोड आंबट काहीही खाण्याची इच्छा राहात नाही.
