(हिंदुस्तानी भाषेतील
3497.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
आप तरे त्याकी कोण बऱ्हाई । औरनकु भलो नाम धराई ॥धृपद॥
काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहि दुध चाखे ॥१॥
बरसते मेघ फलतही बिरखा । कोन काम अपनी उन्हो तिरखा ॥२॥
काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥
काहे परिस कंचन करे धातु । नहि मोल तुटत पावत घातु ॥४॥
कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥
अर्थ :
जो स्वत: तरतो त्याची काय बढाई करावी जो दुसऱ्याला तारतो त्याचेच नाम नेहमी घ्यावे. भूमीएवढा सर्व भार का सहन करत असेल आणि दुभती गाय आपले दुध स्वत: कधीही चाखत नाही पण दुसऱ्याला पिण्यास देते. मेघ सतत वर्षाव करत असतात वृक्ष नेहमी फळ देत असतात परंतू त्यांचे हे कर्तव्य ते करत असताना ते यामध्ये आपल्याला काय फायदा होईल याचा विचार देखील करत नाहीत. चंद्र आणि सूर्य नेहमी पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात ते थोडा वेळ देखील बसत नाहीत ते कशासाठी ? परीस धातू लोखंडाला सोने का बरे करीत असेल आणि लोखंडाला सोने केले तरी देखील तो स्वत: सोने होत नाही असे असले तरी देखील त्याचे मोल काही कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याचा अर्थ असा की नेहमी दुसऱ्यावर उपकार करत राहावात रघुराज प्रभू राम देखील दुसऱ्यावर नेहमी उपकार करत आहेत.
