अहो दयाळे ज्ञानाबाईं
3523.
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझे तुझ्या पायी ॥१॥
इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥
सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥
पूर्व पश्चिम देवस्थान । मध्ये ज्ञानाबाई आपण ॥४॥
ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनी शरण जाऊ ॥५॥
