वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(कवित्वाचा निषेध व त

🙏 3. संत तुकाराम · ABH-079414 · अभंग क्र. ३५१७

3517.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नाही आइकत तुम्ही माझे बोल । कासया हे फोल उपणू भूस ॥१॥
येसी ते करीन बैसलिया ठाया । तूचि बुझावया जवळी देवा ॥धृपद॥
करावे ते केले सकळ उपाय । आता पाहो काय अझुनि वास ॥२॥
तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनिया नीट पाया पडो ॥३॥

अर्थ :
देवा मी काव्यरुपाने जी काही बडबड करतो ते तुम्ही ऐकतच नाही तर भुस उपणल्यासारखे व्यर्थ बडबड तरी मी कशासाठी करु ? देवा मी असा उपाय करीन की मी स्वत: जागेवर बसून राहील पण तू माझी समजूत काढण्यासाठी माझ्याजवळ येशील. देवा तू माझ्याकडे येशील मला तुझे दर्शन देशील यासाठी मी जेवढे काही उपाय करायचे होते ते सर्व केले आहे परंतू आता यापुढे किती तुझ्या दर्शनाची अपेक्षा पाहावी किती तुझी वाट पाहावी ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता माझ्या अपेक्षा आशाचा शेवट झाला आहे आता मी नीट होऊन तुझ्या पाया पडत आहे आता तरी तुम्ही मला दर्शन दयावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग