सदोदित मना निवृत्तीच
3505.
सदोदित मना निवृत्तीचे पायी । मना आणिक ठायी जाऊ नको ॥१॥
जपतप काही न करी साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामे ॥२॥
तीर्थ व्रत चाड न धरी अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥
तीर्थाचें हे तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनी निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥
