नमो ज्ञानराजा नमो ज्
3508.
नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥
नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्हातटीं ॥२॥
समाधि वैभव पाहता नयनी । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥
एका जनार्दनी म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥
