(तुकोबाचा पत्नीस उपद
3510.
(तुकोबाचा पत्नीस उपदेश)
कोण येते घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाही धंदा ॥१॥
देवासाठी जाले ब्रम्हांड सोइरे । कोवळ्या उत्तरे काय वेचे ॥धृपद॥
माने पाचारिता नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठी ॥२॥
तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेसे श्वान लागे पाठी ॥३॥
अर्थ :
महाराज आपल्या पत्नीस म्हणतात की, कोण आमच्या घराला विनाकारण उगाचच कशाला येईल ज्याला त्याला ज्याचा त्याचा व्यवसाय नाही काय ? देवामुळे सारे ब्रम्हांड माझे सोयरे झाले आहे त्यामुळे लोक माझ्याकडे घरी येतात आणि घरी आलेल्या लोकांशी तू जर मृदू शब्दामध्ये भाषांतर केले तर तुझे काही खर्च होणार आहे काय ? ज्या लोकांना मान सन्मान देऊन देखील ते कोठेही जात नाहीत असे लोक घरी माझ्या प्रेमापोटी माझ्याकडे येतात. तुकाराम महाराज म्हणतात, पण हे रांडे तुला हे लोक घरी आलेले का आवडत नाही तुला याचे भूषण वाटत नाही पिसाळलेले कुत्रे जसे पाठीशी लागते तसे तू माझ्या पाठीशी का लागतेस ?
