वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

कळा तो अभ्यास कासया

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085339 · अभंग क्र. ३४९९

3499.
कळा तो अभ्यास कासया करणे । निवृत्ति नाम घेणे धणीवरी ॥१॥
धणीवरी नाम घेईं पा अंतरी । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥
व्यर्थ खटपट न करी पसार । निवृत्ति नामे साचार जप करी ॥३॥
गुज गुह्य तुज सांगतो मना । निवृत्तिनाम जाणा ह्रदयी धरी ॥४॥
एका जनार्दनी निवृत्ति नाम वाचे । संसाराचे साचे सार्थक जाले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग