वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(हिंदुस्तानी भाषेतील

🙏 3. संत तुकाराम · ABH-079787 · अभंग क्र. ३५०२

3502.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
काहे भुला धनसंपत्तीघोरे । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥१॥
राजे लोक सब कहे तू आपना । जब काल नही पाया ठाना ॥धृपद॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥
राना रंग डोंगरकी राई । कहे तुका कर इलाहि ॥३॥

अर्थ :
अरे तू धनसंपत्तीच्या महाघोर मोहाला का भुलला आहेस त्यापेक्षा रामनाम ऐक आणि तेच गात राहा. अरे तू राजाला व तुझ्यासंबधी असलेल्या सर्व लोकांना आपले म्हणतोस परंतू ज्यावेळी काळ तुझ्याजवळ येऊन थांबेल तुला घेण्यासाठी त्यावेळी तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही. अरे माया संसारीक सर्व धंदा हे मिथ्या आहे त्यामुळे तू अभिमानाचा त्याग कर आणि गोविंदाचे भजन कर. तुकाराम महाराज म्हणतात, तो गोविंद राजाचा रंक डोंगराची राई एका क्षणात करु शकतो असा तो बलाढय आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग