वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(कवित्वाचा निषेध व त

🙏 3. संत तुकाराम · ABH-079841 · अभंग क्र. ३५२१

3521.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
बोलता वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळो आले ॥१॥
मागतिले नये अरुचीने हाता । नाही वरी सत्ता आदराचीअ ॥धृपद॥
समाधानासाठी लाविलासे कान । चोरलेसे मन दिसतसा ॥२॥
तुका म्हणे आम्हा तुमचेचि फंद । वरदळ छंद कळो येती ॥३॥

अर्थ :
मी तुमच्याशी काहीही बोलू लागलो की तुम्ही माझ्याकडे पाठ करुन उभे राहाता परंतू देवा तुमचा माझ्याविषयी काय भाव आहे ते मला कळून आले आहे हे फार बरे झाले. मी तुम्हाला जे आवडीने मागतो ते तुम्ही कधीही माझ्या हातात आवडीने देत नाहीत माझ्या शब्दाचा आदरही तुम्ही करत नाही त्यामुळेच तर मला जे हवे आहे ते तुमच्याकडून मिळत नाही. देवा अहो तुम्ही केवळ माझे समाधान करण्यासाठी माझ्याकडे कान लावलेले आहेत परंतू मला काही देण्याविषयी तुम्ही तुमचे चोरुन ठेवले आहे असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे वरवरचे छंद फंद आम्हाला चांगलेच कळून येतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग