वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(कोरड्या कविता उदकात

🙏 3. संत तुकाराम · ABH-079450 · अभंग क्र. ३५३८

3538.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
तू माउलीहून मायाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥
देऊ काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलो ॥धृपद॥
तुवा केले रे अमृता गोड त्या ही तू परता । पाचा त्तवाचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥
काही न बोलोनि आता उगाच चरणी ठेवितो माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करी अपराध ॥३॥

अर्थ :
देवा तू माऊलीपेक्षाही मायाळू, चंद्रापेक्षाही शीतळ, देवा तू पाण्यापेक्षाही पातळ आहेस आणि प्रेमाचा तर कल्लोळच आहेस. हे पुरुषोत्तमा दुसरी तुला कोणती उपमा दयावी ? देवा तुझ्या नामावरुन तर मी आपला जीव ओवाळून टाकला आहे. देवा तू अमृताची निर्मिती केलीस परंतू त्यापेक्षाही तू अधिक गोड आहेस. देवा तू पाच तत्वाचा जनिता म्हणजे निर्माता आहेस त्यामुळे सर्वत्र तुझीच सत्ता आहे व सकळांचा तूच नायक आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा मी आता काहीही बोलत नाही काहीही न बोलता उगीचच तुझ्या चरणी माथा ठेवतो. तरी हे देवा मी आतापर्यंत जे काही अपराध केले ते सर्व क्षमा करा ही एवढी विनंती तुम्हाला मी करत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग