माझ्या मना तू करी पा
3504.
माझ्या मना तू करी पा विचार । नाम निरंतर निवृत्ति जपे ॥१॥
जपतां नामावळी आळस न करी । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणे ॥२॥
सुखरुप तू होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥
एका जनार्दनी सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥
