वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

श्रीज्ञानदेवें येउनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085501 · अभंग क्र. ३५२४

3524.
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागी ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगी ॥३॥
ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिले द्वार ॥४॥
एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग