मन माझे लागो सोपानचर
3537.
मन माझे लागो सोपानचरणीं । मस्तक हे धणी पायांवरी ॥१॥
सोपान सोपान जपेन हे नाम । अन्य न करी नेम दुजा कांही ॥२॥
वारी पा सांकडे प्रपंच काबाड । घालूनिया आड नामशास्त्र ॥३॥
जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावे ॥४॥
