वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

असो तुझे तुजपाशी । आ

🙏 3. संत तुकाराम · ABH-079555 · अभंग क्र. ३५२६

3526.
असो तुझे तुजपाशी । आम्हा त्यासी काय चाड ॥१॥
निरोधे का कोंडू मन । समाधान असोनी ॥धृपद॥
करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥
तुका म्हणे येउनि रागा । का मी भागा मुकेन ॥३॥

अर्थ :
देवा तुझे वागणे कसेही असले तरी ते तुझ्याजवळच असू दे आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे ? माझे मन समाधानी असताना तुझ्याशी विरोध करुन मनाची कोंडी का करत बसू ? जेवढी आम्ही आटाआटी करावी तेवढी खटपट मात्र वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्यावर रागवून माझ्या मिळणाऱ्या वाटयाला का मुकेन ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग