वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

काही मागणे हे आम्हा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079375 · अभंग क्र. ३५२४

3524.
काही मागणे हे आम्हा अनुचित । वडिलांची रीत जाणतसो ॥१॥
देह तुच्छ जाले सकळ उपाधी । सेवेपाशी बुद्धि राहिलीसे ॥धृपद॥
शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाही अंगी ॥२॥
तुका म्हणे देह फांकिला विभागी । उपकार अंगी उरविला ॥३॥

अर्थ :
देवा तूझ्याजवळ काही मागणे हे आमच्यासाठी अनुचित आहे कारण पूर्वीच्या संतांची रीत आम्ही जाणत आहोत. देवा देहाबरोबरच सर्व उपाधी आमच्यासाठी तुच्छ झाल्या आहेत त्यामुळेच तर आमचे मन तुझ्या सेवेच्या ठिकाणी आम्ही एकनिष्ठ केले आहे. कोणतेही शब्द उच्चारणे म्हणजे एक प्रकारची उपाधीच आहे त्यापेक्षा अचल होऊन शांत बसणे हाच निश्चय मी केला आहे आणि मौन धारण करुन बसण्याचा अनुभव माझ्या अंगी नाही की काय ? तुकाराम महाराज म्हणतात, हा देह पंचमहाभूतांचा आहे व ज्याचा त्याचा विभाग मी पंचभूताकडे देऊन टाकला आहे आता केवळ परोपकार करण्याचाच निर्णय मी माझ्या अंगी ठेवलेला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग