प्रपंच परमार्थ करी क
3503.
प्रपंच परमार्थ करी का रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥
तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥
योगयागादिक न लगे ती साधने । निवृत्तिनामे पेणे वैकुंठींचे ॥३॥
एका जनार्दनी न करी साधन । निवृत्ति म्हणता जाण सर्व जोडे ॥४॥
