योगियांचें ध्यान पै
3541.
योगियांचें ध्यान पै विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोह कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणा ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागी तो द्यावा । एका जनार्दनी करावा कृपापात्र ॥४॥
