वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(कवित्वाचा निषेध व त

🙏 3. संत तुकाराम · ABH-079624 · अभंग क्र. ३५१८

3518.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नोंहे तुम्हा जरी । येवढे कारण मुरारी ॥१॥
मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥धृपद॥
स्वामींचे ते सांडे । पुत्र होता काळतोंडे ॥२॥
शब्दा नाही रुची । मग कोठे तुका वेची ॥३॥

अर्थ :
हे मुरारी तुम्हाला माझे एवढेसे कामही करवत नाही काय ? आता जसा काळ येईल जसे माझ्या आयुष्यात घडेल तसे सोसत राहावे. राजपुत्राचे जर का तोंड काळे झाले तर त्यामध्ये राजाचाही कमीपणा होऊन त्याची मानहानी होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी बोललेले शब्द तुम्हाला आवडत नाही तुम्हाला पसंतीस पडत नाही तर मग मी माझे शब्द व्यर्थ का खर्च करु ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग