वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 137. श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९

श्रीसोपानदेवांची स्त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087044 · अभंग क्र. ३५३४

3534.
श्रीसोपानदेवांची स्तुति - अभंग ३५३४ ते ३५३९

नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥
तुमचा प्रसाद द्यावा माझे हाती । एका जनार्दनी विनंती करीतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग