वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आहे तेचि पुढे पाहो ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079574 · अभंग क्र. ३५२७

3527.
आहे तेचि पुढे पाहो । बरे आहो येथेंचि ॥१॥
काय वाढवूनि काम । उगाच श्रम तृष्णेचा ॥धृपद॥
स्थिरावता ओघी बरे । चाली पुरे पडेना ॥२॥
तुका म्हणे वळिता मन । आम्हा क्षण न लगे ॥३॥

अर्थ :
आम्ही आता ज्या स्थितीत आहोत त्याच स्थितीत समाधान मानू पुढे कसे होईल याचा विचार करणार नाहीत. उगाचच इच्छेची तहान वाढवून व्यर्थ श्रम का वाढवावे ? ओघामध्ये स्थिर उभे राहाणे हेच चांगले उगाच वाहात जाणे हे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, इच्छेच्या तृष्णेपासून मनाला वळवण्यासाठी आम्हाला एक क्षण देखील लागणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग