वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

ज्ञानदेव चतुरक्षरीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085489 · अभंग क्र. ३५१७

3517.
ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हे ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनी वदे तो॥
ध्रु०॥नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहता उदक नव्हे भिन्न ।
नवल हेचि पशु ह्मौसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्वावें जपतां होय विज्ञान ॥२॥
देवाधीश देव भक्ताप्रती वर दे । देता वर ब्रह्मांडा ब्रह्मा आनंद कोंदे ।
देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥
वक्ता श्रोता श्रवणेंपठणें पावती समभाव । वर्णू जाता अघटित महिमा होतो जीवशिव ।
वंदुनी अनन्य एका जनार्दनी धरी दृढभाव । वर्षती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग