अहं सोहं कोहं सांडोन
3500.
अहं सोहं कोहं सांडोनिया देई । निवृत्तीचे पायी बुडी देखा ॥१॥
अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । ते निवृत्तिनाम जाण सत्य होय ॥३॥
शुध्द बुध्द नाम निवृत्तीचे वाचे । एका जनार्दनी साचे स्मरे मनी ॥४॥
