आनंद समाधि संत भक्त
3536.
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरी ॥१॥
गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केले सुरवरी ॥२॥
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥
तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥
एका जनार्दनी सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥
