वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कीर्तनाच्या सुखे सुख

🙏 3. संत तुकाराम · ABH-080583 · अभंग क्र. ३०५६

3056.
कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव । पंढरीचा राव संगी आहे ॥१॥
भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवे अनंत हिंडतसे ॥धृपद॥
त्रैलोक्य भ्रमण करित नारद । त्यासंवे गोविंद फिरतसे ॥२॥
नारद मंजुळ सुस्वरे गीत गात । मार्गी चालताहे संगे हरी ॥३॥
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाही आणिकाची प्रीति ऐसी ॥४॥

अर्थ :
नामसंकीर्तनाच्या सुखानेच हा देव सुखी होतो आणि हा पंढरीराव त्यांच्या संगतीतच नेहमी असतो. भक्त हरीची किर्ती सदासर्वकाळ गातच असतो आणि तो जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याच्यामागे हा अनंत हिंडतच असतो. नारदमुनी नारायण नारायण नाम जपत त्रैलोक्यात भ्रमण करीत फिरत असतात आणि हा गोविंद देखील त्याच्या पाठीमागे सारखा फिरतच असतो. नारद हरीचे मंजूळ सुस्वरात गीत गात ज्या मार्गाने चालतात त्याच मार्गाने नारदांच्या बरोबर हरी देखील त्यांच्या बरोबरच चालत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला नामसंकीर्तनाची जितकी गोडी आहे तितकी तर कोणत्याही साधनाची आवड व गोडी नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग