वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

वांझेने दाविले गऱ्हव

🙏 3. संत तुकाराम · ABH-080428 · अभंग क्र. ३०१७

3017.
वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण । चिरगुटे घालून वाथयाला ॥१॥
तेवी शब्द झणी करिती चावटी । ज्ञान पोटासाठी विकूनिया ॥धृपद॥
बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवुनिया तृप्त कोण झाला ॥२॥
कागदी लिहिता नामाची साकर । चाटिता मधुर गोडी नेदी ॥३॥
तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाही लाज चित्ती निसुगाला ॥४॥

अर्थ :
एखादया वांझ स्त्रीने जरी पोटाला चिरगुटी बांधून ती गर्भवती असल्याचे लक्षण दाखवले तरी ते व्यर्थच ठरते. त्याप्रमाणे काही लोक असे आहेत की त्यांना शब्दज्ञान आहेत परंतू लोकांच्यापुढे ते बडबड करतात आणि ते शब्दज्ञान पोटासाठी विकतात. अहो नुसतेच बोलले की कढी घ्या किंवा नुसतेच बोलले भात घ्या तर असे जेवण करुन कुणी तृप्त झाले काय? एखादया कागदावर नुसतेच साखरेचे नांव लिहिले व त्या साखरेच्या नावावर जीभेने चाटले तर साखरेची गोडी आपल्याला चाटल्यावर लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा शब्दज्ञान असणाऱ्या माणसाच्या महतीला आग लागो ते जळून जाओ अशा कोडग्या माणसाची कितीही विटंबना झाली तरी त्याच्या चित्तात लाजच नसते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग