देव तिही बळे धरिला स
3050.
देव तिही बळे धरिला सायासे । करूनिया नास उपाधीचा ॥१॥
पुर्वपक्षी धातु धिक्कारिले जन । स्वये जनार्दन तेचि झाले ॥२॥
तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवे गोडी येईल कळो ॥३॥
अर्थ :
सर्व उपाधीचा नाश जो करतो तोच देवाला आपल्या भक्तीच्या बळाने व आधिकाराने वश करतो. जे परमार्थाच्या सुरवातीलाच सोने नाणे जण धन यांचा धिक्कार करतात ते परमार्थात पुढे चालून स्वत: जनार्दन रुपच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामधे तातडी करुन चालत नाही तर हळूहळू अनुभवानेच देवाची गोडी कळून येते.
