जयासी नावडे वैष्णवाच
3016.
जयासी नावडे वैष्णवाचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरी ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाही जया ॥धृपद॥
मंजुळवदनी बचनागाची कांडी । शेवटी विघडी जीवप्राणा ॥२॥
तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
अर्थ :
ज्यांना वैष्णवांची संगती आवडत नाही ते पूर्वजन्मी मांगच होते असे जाणावे. ज्याची वाचाच अपवित्र आहे आणि ज्याचे आचरण धर्मानुसार नाही तो जातीचाच अधम आहे असे समजावे. बचनागाची कांडी जर तोंडात घातली तर ती खाण्यास गोड लागते परंतू ती आपल्या जीवप्राणावर देखील बेतत असते त्याप्रमाणे अधम मनुष्याच्या संगतीने मनुष्याला त्रासच होत असतो जरी तो आपल्याशी चांगला वागत असला तरी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा पिताच शुध्द नाही त्याच्यापासून गोविंद अंतरला आहे.
