वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नित्य उठोनिया खावयाच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080638 · अभंग क्र. ३०३३

3033.
नित्य उठोनिया खावयाची चिंता । आपुल्या तू हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृपद॥
चातका लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥२॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरी । तयांलागी हरी उपेक्षीना ॥३॥
तुका म्हणे भाव धरुन राहे चित्ती । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥

अर्थ :
अरे दररोज उठून केवळ खाण्याचीच चिंता करत बसतोस परंतू आपल्या हिताविषयी तू कधीही विचार करत नाहीस. अरे ज्यावेळी तू तुझ्या आईच्या पोटातून जन्मलास त्यावेळी देखील त्यानेच तर तुझ्या खाण्यापिण्याची चिंता केली. जो चातकासाठी नेहमी मेघवर्षाव करतो तो तुला केव्हा उदास करीन ? अरे या पृथ्वीतलावर पशू पक्षी वनचर खूप आहेत त्यांची देखील हरी उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे त्या श्रीपतीविषयी तू तुझ्या चित्तामध्ये एकनिष्ठ भक्तीभाव धरुन राहा मग तो तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग