वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अंगी ब्रम्हक्रिया खि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080624 · अभंग क्र. ३०१९

3019.
अंगी ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥
अंत्यजाची खिचडी घेताती मागून । गाळियाप्रधानि मायबहिणी ॥धृपद॥
उत्तमकुळी जन्म क्रिया अमंगळ । बुडविले कुळ उभयता ॥२॥
तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वार्थे बुडविली आचरणे ॥३॥

अर्थ :
काही ब्राम्हण असे आहेत की जे व्याज बट्टयाचा व्यापार करतात आणि पैसे वसूल करण्याकरता चांडाळाच्या घरोघरी हिंडतात. हे असे लोक जर भूक लागली तर पोटासाठी अंत्यजाकडून देखील खिचडी मागून घेतात व खातात आणि व्यापार करताना एखादयाने पैसे दिले नाही तर त्याला त्याच्या माय बहिणीवर देखील शिव्या देतात. अशा ब्राम्हणांचा जन्म जरी उत्तम कुळात झाला असला तरी देखील त्यांचे कर्म अमंगळ असते त्यामुळे त्याने त्याच्या आई व वडील या दोन्ही कुळांना नरकामध्येच बुडवलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अहो हा तर कलीयुगाचा व्यापारच आहे कलीयुगामध्ये लोक स्वार्थासाठी आपले आचरण देखील बुडवत असतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग