वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

जायाचे शरीर जाईंल क्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080656 · अभंग क्र. ३०५२

3052.
जायाचे शरीर जाईंल क्षणांत । का हा गोपिनाथ पावेचि ना ॥१॥
तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥धृपद॥
अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला । पायापे विठ्ठला ठेवी मज ॥२॥
तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करिल माझे ॥३॥

अर्थ :
हे शरीर केव्हा तरी जाणारच आहे व ते क्षणात केव्हाही जाईल पण तरी देखील मला हा गोपीनाथ भेटत नाही ? हे संतजनहो तुम्ही सारेच कृपेचे सागर आहात त्यामुळे माझा निरोप देवाला तुम्ही आग्रह करुन सांगा. हा तुकाराम अनाथ आहे, अज्ञानी आहे याला येथे कोणीही नाही त्यामुळे हे विठ्ठला तुम्ही मला तुमच्या पायाजवळच ठेवा असा माझा निरोप तुम्ही विठ्ठलाला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजनहो अशी सूचनाच तुम्ही त्या विठ्ठलाला करा मग तो माझे रक्षण करील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग