मायेविण बाळ क्षणभरि
3057.
मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस ॥१॥
आणिक उदंड बुझाविती तरी । छंद त्या अंतरी माउलीचा ॥धृपद॥
नावडती तया बोल आणिकाचे । देखोनिया नाचे माय दृष्टी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकाचे बोली चाड नाही ॥३॥
अर्थ :
आईवाचून बाळ एक क्षणभर देखील राहात नाही ती दिसली नाही की ते कासावीस होते. अनेक लोक त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात परंतू त्याच्या अंतरंगात त्याच्या आईचा छंद असतो. त्या बाळाला इतर कोणाचेही बोल आवडतच नाही एकदा की त्या मातेला त्याने दृष्टीने पाहिले की, ते नाचूच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच माझी आई देखील विठाबाई आहे त्या विठाबाई वाचून मला इतर कोणाचेही बोल आवडतच नाही.
