वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आइके नारायणा वचन माझ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080876 · अभंग क्र. ३०३९

3039.
आइके नारायणा वचन माझे खरे । सांगतो निर्धारे तुजपासी ॥१॥
नाही भाव मज पडिली लोककाज । राहिलेसे काज तुझे पायी ॥धृपद॥
वरदळ भक्ती करितो मी नित्य । परी नाही चित्त तुझे पाई ॥२॥
जरि तुज काही करणे उचित । तारी तू पतित तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
हे नारायणा मी तुझ्याजवळ निर्धाराने एक खरे खरे वचन सांगतो ते तू ऐक. देवा माझा तुझ्याविषयी खरा भक्तीभाव नाही मला तर लोकलज्जा आडवी येत आहे परंतू माझे सर्व कार्य तुझ्या पायाजवळच राहिले आहे. परंतू देवा तरी देखील मी दांभिकपणाने तुझी भक्ती नित्य करीत असतो. असे असले तरी माझे चित्त काही तुझ्या पायाच्या ठिकाणी राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जर तुला काही उचित करावेसे वाटले तर या पतिताला तू तार.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग