वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

धन्य दिवस आजि डोळिया

🙏 3. संत तुकाराम · ABH-080527 · अभंग क्र. ३०१३

3013.
धन्य दिवस आजि डोळिया लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥
धन्य झाले मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करू ॥धृपद॥
धन्य हे मस्तक सर्वाग शोभले । संताची पाउले लागताती ॥२॥
धन्य आजि पंथे चालती पाउले । टाळिया शोभले कर दोन्ही ॥३॥
धन्य तुका म्हणे आम्हासी फावले । पावलो पाउले विठोबाची ॥४॥

अर्थ :
आज मी हरीचे आनंदस्वरुप माझ्या डोळयाची तृप्ती होईपर्यंत पाहिली त्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. आज माझे मुख धन्य झाले आणि माझी जिव्हा म्हणजे रसना शांत झाली कारण ती नारायणाचा नामघोष करीत आहे. आज माझे मस्तक धन्य झाले कारण संतांची पाऊले या मस्तकाला लागलीत व त्यामुळे माझे सर्वांग शोभून दिसत आहे. आज माझे दोन्हीही पाऊले धन्य झाली आहेत कारण ते पंढरीच्या वाटेने चालत आहेत व चालताना हरीचे नाम घेऊन माझे दोन्हीही कर टाळया वाजवित आहेत त्यामुळे माझे हात देखील शोभत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आज आम्ही धन्य झालो आहे कारण आम्हाला सहजरित्या विठोबाचे पाऊले प्राप्त झाली आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग