पापिया चांडाळा हरीकथ
3047.
पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयी आवडे गाणे त्याला ॥१॥
ब्राम्हणा दक्षणा देता रडे रुका । विषयालागी फुका लुटी धन ॥धृपद॥
वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । भोरप्यासी शाला वाटीतसे ॥२॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अर्थ :
पापी आणि चांडाळ माणसांना हरीकथा कधीही आवडत नाही परंतू त्यांना वैशिक सुख देणारे गाणे फार आवडतात. ब्राम्हणांना एक रुपया दक्षिणा देण्यासाठी देखील हा रडत असतो परंतू विषयभोग भोगण्याकरता खूप धन लूटतानाही मागेपुढे पाहात नाही. अतिथीला हा वीतभर लंगोटी देखील देणार नाही परंतू बहुरुप्याला शाल जोड्या वाटत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या तोंडावर थुंका कारण पुढे तो यमपुरीच भोगण्यासाठी जाईल.
