वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

माझे मुख नामी रंगो स

🙏 3. संत तुकाराम · ABH-080603 · अभंग क्र. ३०४५

3045.
माझे मुख नामी रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
अबद्ध चांगले गाऊ भलतैसे । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥
तुका म्हणे मज न लवी वाकडे । मी तुझे बोबडे बाळ तान्हे ॥३॥

अर्थ :
माझे मुख नेहमीच सर्वकाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ या नामात रंगो. लहान बाळ आई बापाजवळ कसेही वेडे वाकडे बोबडे बोल बोलते त्याप्रमाणे मी या हरीचे नाम शुध्द अबध्द चांगले जसे जमेल तसे गात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला वाकडयात लावू नकोस मी तुझ्याशी बोबडे बोलणारे तुझे तान्हे बाळ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग