वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

यालागी आवडी म्हणा रा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080896 · अभंग क्र. ३०४६

3046.
यालागी आवडी म्हणा रामकृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
सोपे हे साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥धृपद॥
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
न लगे तप तीर्थ करणे महादान । केल्या एक मन जोडे हरी ॥३॥
तुका म्हणे काही न वेचिता धन । डोले नारायण नामासाठी ॥४॥

अर्थ :
लोकांनो नारायणाची प्राप्ती करुन घेण्यासाठी तुम्ही सर्वकाळ रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार करा आणि नारायणाशी नाते जोडून घ्यावे. हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी नाम हे अतिशय सोपे साधन आहे व नाम घेतल्याने सर्व लाभ घरी चालत येतात त्यामुळे वाचेने राम हरी या नामाचा उच्चार करा. अहो नारायणाशी नाते जोडण्याकरता कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा सायास करावे लागत नाही केवळ विठ्ठलाचा अभ्यास करावा. नारायणाची प्राप्ती करुन घेण्यासाठी नारायणाशी नाते जोडण्याकरता कोणत्याही प्रकारचे तप तीर्थ किंवा महादान करण्याची गरज नाही केवळ एकाग्र मन केले की नारायणाशी नाते जोडले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही प्रकारचे धन खर्च न करता केवळ हरीचे नाम घेतले की, नारायणाचा लाभ होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग