विषय - अभंग ३०५२ ते
3052.
विषय - अभंग ३०५२ ते ३०८२
मातला बोकड भलत्यावरी धांवे । तैसा भरला विषय हावे ॥१॥
नाठवेचि आपपर । सदा हिंडे परद्वार ॥२॥
शिकविले मानी वोखटें । उताणा नेटे चालतसे ॥३॥
कर्म धर्म नावडेचि कांही । विषयप्रवाहीं बुडतसे ॥४॥
एका जनार्दनी ते पामर । भोगिती अघोर कुंभपाक ॥५॥
