जेणे माझे हित होईल त
3061.
जेणे माझे हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनिया ॥१॥
मज नाही सुख दुःख तया खंती । भावना हे चित्ती नाना छंदे ॥धृपद॥
तोडी हे संबंध तोडी आशापाश । मज हो सायास न करिता ॥२॥
तुका म्हणे मी तो राहिलो निश्चिंत । कवळोनि एकांत सुख तुझे ॥३॥
अर्थ :
देवा माझ्या मनातील भक्तीभाव जाणून घेऊन जेणेकरुन माझे हित होईल असाच उपाय तू करशील. देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख दु:ख किंवा खंत नाहीच आणि माझ्या चित्तामध्ये तुझ्यावाचून इतर कोणत्याही प्रकारचे विविध प्रकारचे छंद आणि भावनाही नाहीत. देवा माझा संसारसंबंध आणि आशापाश मला कोणत्याही प्रकारचे सायास न होता तुम्ही तोडून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या सुखाला मी एकातात आलिंगन देऊन निश्चिंत राहीलो आहे.
